चीनचा अजब कारनामा ! आता समुद्राच्या खाऱ्या पाण्यात येणार भाताचे पीक; नापीक जमिनीचे टेन्शन मिटले
चीनच्या कृषी संशोधन संस्थेने खाऱ्या पाण्यात शेती करण्याचा एक अद्भूत आणि क्रांतिकारी प्रयोग यशस्वी केला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी 'सी वॉटर राईस' (Sea Water Rice - खाऱ्या पाण्याचे भात) चे नवीन वाण विकसित केले आहे, जे थेट समुद्राच्या पाण्यावर किंवा किनारपट्टीच्या अत्यंत खाऱ्या जमिनीतही उत्तम प्रकारे वाढू शकते आणि बंपर उत्पादन देते. जगातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता हा शोध अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जगातील लाखो हेक्टर पडीक आणि खाऱ्या किनाऱ्यावरील जमिनीवर भाताची शेती करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे जागतिक अन्न संकट कायमचे मिटवण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे